अमरावती: कोरोना विषाणुचे संसर्ग होऊ नये म्हणुन महाराष्ट्र शासनाकडून लागु करण्यात आलेल्या कोरोना नियमावलीचे पालन करून दि.3 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोग विभागीय कार्यालय, अमरावती मार्फत क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांच्या जयंती निमित्त मुलींचे निरीक्षण गृह अमरावती येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन हे सुनिल शिंगणे, विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास अमरावती विभाग अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
तसेच कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथि म्हणुन सीमा दाताळकर मॅडम, पोलीस निरिक्षक, सायबर क्राइम शाखा, अमरावती यांना आमंत्रित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अमरावती जिल्हा समन्वयक गाडेकर सर यांना प्रमुख उपस्थिती म्हणुन आमंत्रित करण्यात आले. तसेच कार्यक्रमात महिला विषयक कायदे, महिला समोरील आव्हाने इत्यादी बाबत परीसंवादाचे आयोजन केल्या गेले. प्रमुख अतिथी दाताळकर मॅडम यांनी मुलींशी परीसंवाद साधले. व सायबर क्राइम बद्यल माहिती दिली. व तसेच जिल्हा समन्वयक गाडेकर सर यांनी महिला आयोगाची माहिती दिली व मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाअंतर्गत मुलींकरिता भाषण स्पर्धेचे आयोजन केल्या गेले व तसेच मुलींना खाऊ, बक्षिसे इत्यादी वाटप करण्यात आले.तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीना प्रधान, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, वर्ग-2 यांनी केले. सुत्र संचालन अरूणा गांधी, अधिक्षिका, मुलींचे निरीक्षण गृह अमरावती यांनी पार पाडले तर आभार प्रदर्शन रीना गुप्ता यांनी केले.
सदर कार्यक्रमास विभागीय उपआयुक्त, महिला बाल विकास अमरावती, डॉ. उमेश टेकाळे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अमरावती प्रीती वाकोडे, लेखाधिकारी, एड. सीमा भाकरे, इत्यादी सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.