• Thu. Sep 21st, 2023

मजबूत व संवेदनशील असा नवा भारत उदयास

    नवी दिल्ली : हा प्रजासत्ताक दिन देशासाठी बलिदान देणार्‍या शूर वीरांचे स्मरण करण्याचा एक प्रसंग आहे. दोन दिवसांपूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या डिजिटल पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले. आपल्या राज्यघटनेचे स्वरूप सर्वसमावेशक आहे, परंतु स्वातंत्र्य, समानता या मूलभूत गोष्टी त्याच्या प्रस्तावनेत लिहिलेल्या आहेत. मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्ये देखील राज्यघटनेत महत्त्वाच्या पद्धतीने नमूद केलेली आहेत. या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आज एक नवीन भारत उदयास येत आहे. हा एक मजबूत आणि संवेदनशील भारत आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना म्हणाले.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    स्वच्छता मोहिमेपासून ते कोरोना लसीकरणापयर्ंत, सार्वजनिक मोहिमेचे यश हे देशसेवेत देशवासी असलेल्या कर्तव्याचे प्रतिबिंब आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान दिन साजरा केला जातो. १९३0 ते १९४७ पयर्ंत दरवर्षी पूर्ण स्वराज दिन म्हणून साजरा केला जातो आणि तोच दिवस संविधानाचा पूर्ण स्वीकार म्हणून साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनाचा उपयोग काही विधायक कामासाठी करायला हवा, असे महात्मा गांधी म्हणाले होते.

    आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करावे आणि देशासह जगाच्या भल्यासाठी कार्य करावे अशी गांधीजींची इच्छा होती. आता दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, परंतु साथीच्या रोगाविरुद्ध मानवतेचा संघर्ष सुरूच आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. हा विषाणू नव्या स्वरूपात संकट निर्माण करत आहे. हे एक विलक्षण आव्हान राहिले आहे. आपल्या देशात लोकसंख्येची घनता जास्त आहे आणि सुरुवातीच्या काळात आपल्याकडे पुरेशी संसाधने नव्हती, परंतु अशा वेळीच देशाची क्षमता चमकते. कोरोनाशी लढण्यासाठी आपण विशेष कामगिरी केली आहे आणि आता जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवत आहोत, असे ते म्हणाले. राष्ट्रपती पुढे म्हणाले, या संकटाच्या काळात आपण सर्व देशवासी एका कुटुंबाप्रमाणे जोडलेले आहोत हे आपण सर्वांनी पाहिले आहे. सामाजिक अंतराच्या कठीण काळात आपण सर्वांनी एकमेकांशी जवळीक अनुभवली. आपण एकमेकांवर किती अवलंबून आहोत याची जाणीव झाली आहे.

    डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिक्स यांनी कठीण परिस्थितीत दीर्घकाळ काम करून, रुग्णांची काळजी घेण्यासाठी जीव धोक्यात घालून मानवतेची सेवा केली. देशातील उपक्रम सुरळीत चालू ठेवण्यासाठी अनेकांनी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध आहेत आणि पुरवठा साखळी विस्कळीत होणार नाही याची खात्री केली आहे. महिलांना सैन्यात कमिशन देऊन आणि एनडीएमध्ये मुलींना प्रशिक्षण देऊन देशातील महिलांचे सक्षमीकरणही राष्ट्रपतींनी अधोरेखित केले. ते म्हणाले की, आजच्या काळात डॉक्टर, शिपाई किंवा इतर क्षेत्रातील जबाबदारी चोखपणे पार पाडणे हीच देशाची खरी सेवा आहे. देश-विदेशात उच्च स्थान प्राप्त करणार्‍या भारतीयांनी देशसेवेत अधिक चांगले योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,