भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणी तीन दोषींना सहा वर्षांची शिक्षा

    इंदूर : भय्यूजी महाराज आत्महत्येप्रकरणी इंदोरच्या न्यायालयाने सेवक विनायक दुधाळे, चालक शरद देशमुख आणि केअरटेकर पलक पुराणिक यांना दोषी ठरवले आहे. न्यायालयाकडून आरोपींना सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तब्बल साडेतीन वर्षांच्या सुनावणीनंतर सत्र न्यायालयाने हा निकाल दिला.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    महाराजांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांनी महाराजांचे सेवक शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक यांना शिक्षा सुनावली. आरोपी पैशासाठी महाराजांचा छळ करत असे, हे न्यायालयाने मान्य केले.

    भय्यूजी महाराज यांनी १२ जून २0१८ रोजी स्वत:च्या कपाळावर गोळी झाडून आत्महत्या केली होती. भय्यूजी महाराजांना पैशांसाठी ब्लॅकमेलही करण्यात आले. भैय्यू महाराजांना कुटुंबापेक्षा जे सेवेदार होते, ज्यांच्यावर त्यांचा एवढा विश्‍वास होता की त्यांनी त्यांचा आर्शम आणि काम त्यांच्याकडे सोपवले होते, त्याच सेवेदारांनी त्यांना पैशासाठी एवढा त्रास दिला की त्यांना आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागले. याप्रकरणी ३२ जणांची साक्ष नोंदवण्यात आली असून १५0 पुरावे सादर करण्यात आले.