ब्रेकअपच्या चर्चेनंतर मलायका-अर्जुनची लंच डेट

    मुंबई : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी आहे. अलिकडच्याच काळात ब्रेकअपच्या वृत्तामुळे हे दोघंही सोशलम मीडियावर बरेच चर्चेत आले होते.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    अर्थात नंतर हे वृत्त खोटं असल्याचं समोर आलं. त्यानंतर आता मलायका आणि अर्जुन लंच डेटवर जात असताना कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ब्रेकअपच्या खोट्या वृत्तानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले. मुंबईच्या वांद्रे येथील एका रेस्ताराँ बाहेर या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी या दोघांचे काही व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

    या व्हिडीओमध्ये मलायका रफल्ड व्हाइट ड्रेसमध्ये तर अर्जुन कपूर लाइट ब्लू स्वेटशर्ट आणि डेनिमवर दिसत आहे.काही दिवसांपूर्वी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर अर्जुन कपूरनं सोशल मीडियावर मलायकासोबतचा एक फोटो शेअर करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं होतं, ह्यअफवांना जागा नाही. सुरक्षित रहा, आनंदी रहा, खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांना खूप प्रेमङ्घ त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरलही झाली होती. विशेष म्हणजे अर्जुन कपूरने हा फोटो शेअर केल्यानंतर त्यावर मलायका अरोरानेही कमेंट केली होती. कमेंट करताना तिने काहीही न लिहिता फक्त हार्ट इमोजी शेअर केला होता. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा मागच्या ३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या नात्याची सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.