• Tue. Jun 6th, 2023

पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिकचा पुनर्वापर आवश्यक – जिल्हाधिकारी पवनीत कौर

    अमरावती : प्लास्टिक कचरा कमी होऊन पर्यावरण संवर्धन साधले जावे, या हेतूने पुनर्वापराच्या शक्यता पडताळणे आवश्यक असते. स्थानिक स्तरावरही प्लास्टिक पुनर्वापराचा प्रकल्प घनकचरा व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरू शकेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले.

    येथील औद्योगिक वसाहतीतील रि-बेल प्लास्टिक पुनर्वापर प्रकल्पाची पाहणी जिल्हाधिका-यांनी केली व प्लास्टिक पुनर्वापर प्रक्रिया समजावून घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर, तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.

    प्रकल्पात कच-यातून गोळा होणारे प्लास्टिक एकत्र करून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यातून अनेक उपयुक्त वस्तूंची निर्मिती करता येते. टाकाऊ प्लास्टिक कच-यात जाण्याऐवजी पुनर्वापरात येत असल्याने कचरा कमी होऊन प्रदूषणही टळते. अशा प्रकल्पाच्या अनुषंगाने महापालिका व इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांना कार्यवाही करता येईल. तसे प्रयत्न व्हावेत, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *