• Mon. Jun 5th, 2023

निवडणुकांचे निकाल घोषित

    * नगरपंचायतीत राष्ट्रवादी २७, भाजप २२, काँग्रेस २१, शिवसेना १७ व इतर १0 ठिकाणी विजयी

    मुंबई : राज्यात निवडणूक झालेल्या १0६ नगरपंचायतींपैकी ९७ नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. अन्य ९ नगरपंचायतीचे निकाल गुरुवार, २0 जानेवारी रोजी घोषित होणार आहेत. एकूण निकालामध्ये भारतीय जनता पक्षाने २२ नगरपंचायतींमध्ये ४१६ जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने २७ नगरपंचायतीमध्ये ३८७ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसने २१ नगरपंचायतींमध्ये २९७ जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेने १७ नगरपंचायतींमध्ये ३00 जागा मिळवल्या आहेत. इतर १0 ठिकाणी विजयी झाले आहेत.

    राज्यातील विविध जिल्ह्यांमधील ९३ नगरपंचायतींमधील ३३६ जागांसाठी मंगळवारी सरासरी ८१ तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या २३ आणि त्यांतर्गतच्या पंचायत समितीच्या ४५ जागांसाठी ७३ टक्के मतदान झाले होते.राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील १0६ नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता २१ डिसेंबर २0२१ रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार विविध महानगरपालिकांतील ४ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील २१ डिसेंबर २0२१ रोजी मतदान होणार होते; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या १५ डिसेंबर २0२१ च्या आदेशानुसार या कार्यक्रमात अंशत: बदल करण्यात आला.

    या सर्व ठिकाणी बुधवारी मतमोजणी झाली. यामध्ये दुपारपयर्ंत हाती आलेल्या निकालांमध्ये महाविकास आघाडीची सरशी झाली असली, तरी भाजपने एकहाती जोरदार घौडदौड केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा तत्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मंगळवारी मतदान झाले. अन्य सर्व जागांसाठी मात्र पूर्वनियोजितपणे २१ डिसेंबर २0२१ रोजी मतदान पार पडले होते. राज्य निवडणूक आयोगाने एकूण १0६ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *