• Wed. Jun 7th, 2023

नागपूर येथील दिपाली व अंजली राठोड यांच्या जैविकप्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड

    *दिपाली व अंजली राठोड चे सर्वत्र अभिनंदन

    नागपूर : नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेस 2021-2022, मुंबई द्वारा जिल्हा व राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यासाठी वेगवेगळ्या विषयावर फक्त 6 मिनिटाचे ऑनलाइन सादरीकरण घेण्यात आले होते, महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यात *एम.के.एच संचेती पब्लिक स्कूल,गोटाळ पांजरी, नागपूर* येथील *इयत्ता सातवी व सहाव्या वर्गात शिकणाऱ्या दिपाली राठोड व अंजली राठोड* यांच्या प्रकल्पाची संकल्पना होती.

    “ORGANIC FARMING FOR HEALTHY FAMILY AND HEALTHY NATION, “आरोग्यपूर्ण कुटुंब आणि आरोग्यपूर्ण राष्ट्रासाठी जैविकशेती” हा प्रकल्प जिल्हास्तर निवड झाला आणि आता राष्ट्रीय स्तरावर सादरीकरणासाठी निवडण्यात आला आहे.या प्रकल्पासाठी दिपाली आणि अंजली राठोड यांनी परिश्रमपूर्वक शाळेच्या प्राचार्या, शिक्षकवर्ग,अनेक शेतकरी,मान्यवर व आई वडील यांचे मार्गदर्शन घेऊन डाटा संकलन,मांडणी व प्रभावी सादरीकरण करून परीक्षकांच्या प्रश्नोत्तर व चर्चाला माहितीपूर्ण व समर्पक उत्तरे देऊन सर्वांची मने जिंकली आणि राष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या निकषाप्रमाणे निवड होऊन सर्वांच्या अभिनंदनास पात्र ठरलेल्या आहेत.

    विशेष म्हणजे नागपूर शहरासारख्या सिमेंटच्या जंगलात तेही आपल्या राहत्या घरावरील छतावर 100% ऑरगॅनिक (जैविक) आरोग्यदायी परसबाग.*समग्रक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक* यांच्या नावाने “वसंतराव नाईक परसबाग. आरोग्यदायी परसबाग निर्मितीचे अनुभव सर्वांसाठी दिशादर्शक व मार्गदर्शक अशी आहेत. विशेष म्हणजे छतावर प्रत्यक्ष शेतातील माती आणून “बेस्ट आऊट ऑफ वेस्ट” या संकल्पनेतून परस बागेची निर्मिती केले ज्यात कुलरचे ट्रे,तुटलेले सुटकेस,कलर चे डब्बे, मातीची भांडी, तुटलेले बकेट,काही प्लास्टिक कुंड्या यांचा वापर करून आरोग्यदायी परसबाग निर्मिती केली. विशेष म्हणजे परसबागेत 50 पेक्षा जास्त प्रकाराचे 450 पेक्षा अधिक फुलझाडे, फळझाडे,वेलवर्गीय भाजीपाला, भाजीपाला,हळद,मक्यापासून, जंगलातील वनौषधी गुळवेल, शतावरीपर्यंत ते रोज लागणारा कडीपत्ता आणि चक्क लिंबू पर्यंतच्या झाडांच्या सुद्धा समावेश तेही छतावर.. सोबतच आरोग्यदायी तुळस,कोरपड विविध बहारदार शोभिवंत सुगंधी फुलांचाही समावेश आहे.

    त्याचबरोबर चार लोकांचे फिरण्याचे स्वतंत्र ट्रॅक,सूर्यस्नानाची जागा,एक्यूप्रेशर पॉइंट “संत सेवालाल क्रांतीसाधना केंद्र.आणि छोटेखानी मीटिंग साठी केलेले नियोजन व प्रेरणादायी थोर विचारवंतांचे फोटो,प्रेरणादायी भिंती पत्र लावण्यासाठी केलेली आखणी खरोखरच प्रशंसनीय आहे. “परसबाग ज्यांचे घरी आरोग्य तिथे वास करी. हा संदेश प्रत्यक्ष कृतितून देण्यात आला आहे.आजपर्यंत अनेक क्षेत्रातील विविध मान्यवरांचे भेटी ज्यात शिक्षक,डॉक्टर,लेखक कवी,कलाकार,बचतगट प्रतिनिधी व सदस्य यांचा समावेश एकंदरीत आहे. सर्वांना सहज करता येण्यासारखा गरिबातल्या गरिबाला परवडण्यासारखा प्रेरणादायी व दिशादर्शी 100% जैविकखते, कुजलेले शेणखत आणि जैविक द्रवरूप औषधी वापरून,घरातून,बागेतून निघणार्‍या काडीकचरा कुजवून निर्माण केलेले खताने साकारलेला *यशस्वी परसबाग प्रकल्प* खरोखरच दिशादर्शक ठरला आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *