• Fri. Jun 9th, 2023

थंडी आणि धुक्यामुळे ४८१ रेल्वेगाड्या रद्द

    नवी दिल्ली : देशभरात विविध भागात थंडी वाढली आहे. कडाक्याच्या थंडीबरोबर धुके पडत आहे. त्यामुळे रेल्वेच्या ४८१गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टमवर (एनटीईएस) संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

    कडाक्याच्या थंडीबरोबरच अनेक ठिकाणी ट्रॅकच्या दुरुस्तीचे कामही सुरू आहे. त्यामुळे रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टमच्या अधिकृत वेबसाइटवर रेल्वेने याबाबत माहिती दिली आहे. २२४0६ आनंद विहार – भागलपूर गरीब रथ (२४जानेवारी रोजी रद्द), २२४0५ भागलपूर-आनंद विहार गरीब रथ (२३ जानेवारी रोजी रद्द), १३४९९भागलपूर-मुझफ्फरपूर जनसेवा एक्सप्रेस (२३ ते २७ जानेवारीपयर्ंत रद्द), डाऊनमध्ये भागलपूर-मुझफ्फरपूर जनसेवा एक्सप्रेस २३ ते २७ जानेवारीपयर्ंत रद्द, १३२३६ दानापूर-साहिबगंज, १३२३५ साहिबगंज-दानापूर इंटरसिटी एक्सप्रेस (२४ ते २८ जानेवारीपयर्ंत रद्द), १५५५३जयनगर- भागलपूर (२४ ते २८ जानेवारीपर्यंत रद्द), १५५५४भागलपूर-जयनगर एक्सप्रेस (२३ ते २७ जानेवारीपर्यंत रद्द), १३२४२ राजेंद्रनगर- बांका (२४ ते २६ जानेवारीपर्यंत रद्द ), साहिबगंज-जमालपूर, भागलपूर-जमालपूर, जमालपूर-क्यूल दरम्यान धावणार्‍या ९ पॅसेंजर ट्रेन्स २२ ते २८ जानेवारी दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. यासोबतच रेल्वेच्या ४८१ गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले आहेत.

    (Images Credit : Jagran)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *