- आयुष्य जगत असताना
- असंख्य रस्त्यांना तोंड द्यावे लागते
- कधी रडत तर कधी हसत
- हे सुंदर आयुष्य जगावे लागते
- कधी निराशा, तर कधी अपयश
- कधी परिस्थिती तर कधी यश
- यांचं स्वीकार करत
- सतत स्वतः चे अस्तित्व टिकवण्यासाठी आयुष्याशी लढत राहावे लागते
- कदाचित यालाच आयुष्य म्हणता येईल आणि
- जो या सर्व गोष्टीचा स्वीकार करून समाधानी असेल
- त्यालाच या आयुष्याच मनसोक्त आनंद घेता येईल
- अनोळख्या वाटा अनोळखी लोक
- आणि कधी न पाहिलेले संकट
- अचानक समोर येताना
- त्याला सामोरे जाण्याचे सामर्थ्य
- माणसात यायला हवे आणि
- त्यालाच हे सुंदर आयुष्य जगता येईल
- आयुष्याचे गणित कुठल्या पुस्तकात सुटणार नाही
- त्याला सोडवण्यासाठी मात्र
- प्रत्येकालाच आयुष्याच्या रणांगणात उतरावे लागेल
- आणि त्यालाच हे सुंदर आयुष्य जगता येईल
- -प्रतीक्षा मांडवकर
- पिंपळगाव यवतमाळ
- 8308684865