- होते खळकाळ शेत
- थोडी माती काळीभोर
- कसे पेललेस बाबा
- रित्या पाण्याचे अंबर
- नाही पाण्याचा ओलावा
- शेत होते कुपोषित
- कशी जगली माणसे
- गांवकुसाच्या मातीत
- भूक पोटभर होती
- ओठ कोरडे पडले
- किती वेदनेचे घाव
- पाण्यासाठी झेललेले
- पाण्या-पावसात वस्ती
- रडे दुपारच्या वेळी
- कष्ट उपसत होती
- माणसं साधी आणि भोळी
- तरी मिळेना भाकर
- आणि पाणीही ओठाले
- किती राबावे मातीत
- सारे आयुष्य फाटले
- नाही तन मन धन
- लाचारीचं होतं जीणं
- फाटलेल्या आयुष्याला
- गाठी-दो-याची शिवण
- खत बियाणे पेरूण
- शब्द-शब्द उगवले
- तुझ्या जागलीने बाबा
- शेत तरारून आले
- तुझा शब्द झाला घास
- कुस टच्च भरलेली
- तुझ्या पाठीमागे बाबा
- रान-वस्ती विखुरली….
- =अर्जुन मेश्राम,
- लोक विद्यालय, गांगलवाडी
- ता.ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर ४४१२०६
- ९६०४०१३६६७