डॉ. पंजाबराव देशमुख इन्स्टिट्यूटच्या नसिर्ंग अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता दुप्पट

  मुंबई : अमरावतीच्या शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे डॉ. पंजाबराव देशमुख नसिर्ंग इन्स्ट्यिूटला बी.एस्सी. नसिर्ंग या अभ्यासक्रमासाठी सन २0२१-२२ या शैक्षणिक वषार्पासून प्रवेशक्षमता वाढ ५0 वरुन १00 करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. २0२१-२२ पासून या महाविद्यालयातील बी. एस्सी नसिर्ंग या पदवी अभ्यासक्रमाची विद्यार्थी प्रवेशक्षमता शंभर इतकी राहील. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्‍चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने नसिर्ंग अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अँक्ट, १९८७ मधील तरतुदींचे संस्थेने काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  बीडच्या चिखली येथील परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या अनुराधा कॉलेज ऑफ नसिर्ंगला पदवी अभ्यासक्रमासाठी (बी.एस्सी. नसिर्ंग) सन २0२१-२२ या शैक्षणिक वषार्पासून प्रवेशक्षमता वाढ ३0 वरुन ५0 करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
  २0२१-२२ पासून या महाविद्यालयातील बी.एस्सी नसिर्ंग या पदवी अभ्यासक्रमाची विद्याथी प्रवेशक्षमता ५0 इतकी राहील. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्‍चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने नसिर्ंग अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे.

  पुण्याच्या डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटरला कायाचिकित्सा, प्रसूतीतंत्र, स्त्रीरोग आणि कौमारभृत्य बालरोग या विषयातील आयुर्वेद पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता वाढ करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  कायाचिकित्सा या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेशक्षमता सहावरुन १२, प्रसूतीतंत्र आणि स्त्रीरोग या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेशक्षमता सहवरुन १२ आणि कौमारभृत्य बालरोग या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेशक्षमता ४ वरुन १२ करण्यात आली आहे. सन २0२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून ही परवानगी देण्यात आली आहे.