अमरावती : चिखलदरा तालुक्यातील 17 गावांमध्ये नवीन रास्त भाव दुकाने मंजूर करण्यात येणार आहेत. त्यासाठी 18 जानेवारीपर्यंत अर्ज देण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखडे यांनी केले.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!यापूर्वीही याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. तथापि, परिपूर्ण अर्ज न आल्याने पुन्हा ती अर्ज प्रक्रिया करण्यात येत आहे. विहित नमुन्यातील अर्ज तहसीलदार कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळता इतर दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. अर्ज विक्री व स्वीकृतीची मुदत 18 जानेवारीपर्यंत असल्याचे श्री. वानखडे यांनी सांगितले.
- सतरा गावे आहेत
चिखलदरा तालुक्यातील चौ-यामल, भुत्रुम, कुही, भांडुम, पांढरा खडक, रामटेक, कुलंगणा बु., मोझरी, चिचाटी, बागलिंगा, सुमिता, सलिता, खुटीदा, लाखेवाडा, मेमना, टेटू व लवादा या 17 गावांत नवीन रास्त भाव दुकाने सुरू करण्याचे नियोजन आहे.
- दुकानांचे व्यवस्थापन महिलांकडून
ग्रामपंचायत, नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था व नोंदणीकृत सार्वजनिक संस्था किंवा न्यास या प्राथम्यक्रमानुसार ही दुकाने वितरीत होतील. त्याचप्रमाणे, रास्तभाव दुकाने मंजूर झालेल्या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायाने करणे आवश्यक आहे.
- (छाया : संग्रहित)