• Mon. Sep 25th, 2023

ग्रामीण शिक्षणाला दिशा देणारी ‘बदली’ लवकरच भेटीला

    मुंबई : प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत, जेम क्रिएशन्स निर्मित, कोरी पाटी प्रॉडक्शन कृत बदली ही आठ भागांची एक अनोखी वेबसिरीज १५ जानेवारीपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर आपल्या भेटीला येत आहे. शहरातील शिक्षक जेव्हा पहिल्यांदा ग्रामीण भागात जाऊन तेथील मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, हे आपल्याला टिझरमध्ये पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागातील लोकांचे शिक्षणासंदभार्तील विचार आपल्याला या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळणार आहेत. या शिक्षकाने पेललेल्या आव्हानाला यश मिळणार का त्यांची भ्रमनिराशा होणार, हे बदली प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    बदली या वेबसिरीजचे लेखन, दिग्दर्शन नितीन पवार यांनी केले असून मानसी सोनटक्के या बदलीची निर्मिती केली आहे. या वेबसिरीजचे कथा पटकथा आणि संवाद नितीन पवार यांचे असून छायांकन वीरधवल पाटील यांनी केले आहे. तर संगीत आणि पार्श्‍वसंगीत मंदार पाटील यांचे आहे. गाण्याला समीर पठाण यांचे बोल लाभले असून सह-दिग्दर्शन नितीन वाडेवाले यांनी केले आहे.

    बदली या वेबसिरीज बाबत प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, आम्ही नेहमी प्रेक्षकांना वेगळा कंटेंट देण्याच्या प्रयत्न करत असतो .या आधीही आम्ही विविध विषयांवर आधारीत आशय घेऊन आलो आहोत. आमचा प्रेक्षकवर्ग हा फक्त शहरी भागातील नसून ग्रामीण भागातीलही आहे. म्हणून ग्रामीण भागांतील शाळांचा आरसा दाखवणारी बदली ही वेबसिरीज आम्ही जगभरातील लोकांपयर्ंत घेऊन येत आहोत.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,