• Tue. Sep 26th, 2023

ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीचा प्रयत्न – जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

    * राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते शिवणकाम प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    अमरावती : ग्रामीण भागात छोट्या छोट्या व्यवसायांचे जाळे उभारून महिलाभगिनींना रोजगार मिळवून देणे आवश्यक आहे. त्यासाठी गावोगाव शिवणकाम व इतरही विविध रोजगारक्षम कौशल्यांचा विकास करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येईल, असे जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज देऊरवाडा येथे सांगितले.

    चांदूर बाजार तालुक्यात देऊरवाडा, जवळा शहापूर आदी गावांत आधुनिक शिलाई मशिनद्वारे कपडे शिवून तयार करण्याचे प्रशिक्षण उपक्रम व शिवणकाम प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ जलसंपदा राज्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. पं. स. सदस्य सुनीताताई झिंगरे, सरपंच ललिता गायगोले, उपसरपंच आरशिया अंजुम, दीपक भोंगाडे, श्री. मोहोड, साहेबराव निमकर, छत्रपती केदार, सुरेंद्र सोनार, शेर मोहम्मद, वृषाली आवारे, रवी पवार, संजय भलावी आदी उपस्थित होते. महिलाभगिनींना गावातच रोजगार मिळवून देण्यासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे.

    देऊरवाडा येथे अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या ४७ व्यक्तींना पट्टेवाटपाचा कार्यक्रमही राज्यमंत्री महोदयांच्या हस्ते झाला. यावेळी प्रत्येक गरजूला घर मिळवून देणे हे महाविकास आघाडी शासनाचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या अर्जांवर तत्काळ कार्यवाही करण्याबरोबरच आवास योजनांच्या कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,