• Mon. Sep 25th, 2023

गुऱ्हाळ (बालकाव्य)

    चरकात लांब ऊस
    कढईत ताजा रस
    कढईच्या खाली जाळ
    झारी काढी मळी गाळ
    रस शिजे रट्ट रट्ट
    गाढा होई घट्ट घट्ट
    हौदामध्ये बुळ बुळ
    थंड होता होतो गुळ
    आकारास येती ढेपा
    बादलीत गूळ चेपा
    गुळ बने गुऱ्हाळात
    गोड वास शिवारात
    ऊस देई गूळ छान
    काळी माती देई दान
    युवराज गोवर्धन जगताप
    काटेगाव ता. बार्शी
    जिल्हा सोलापूर
    8275171227

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,