अमरावती : शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व आस्थापना, हॉटेल्स, खाद्यगृहे, रेस्टॉरेंट, बार, लग्न समारंभ, सर्व प्रकारची दुकाने आदींसाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा २00५ व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होते.
या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मनपा प्रशासनाव्दारे विशेष पथके गठीत करण्यात आली असून आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर तत्काळ दंडात्मक तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश पथकांना देण्यात आले होते. कोविड प्रतिबंधात्मक आदेशाचे शहरातील सर्व नागरिकांनी काटेकोर पालन करावे.संचारबंदी काळात राजासाहेब रेस्टॉरंट अँड बार ही आस्थापना सुरु असतांना आढळून आल्यामुळे सदर दुकान सिल करण्यात येऊन संबंधितावर संचारबंदी चे उल्लंघन केल्या बाबत पोलीस विभागाचे मार्फत कारवाई करण्यात आली.
या कार्यवाहीमध्ये राजापेठ पोलीस स्टेशन चे पी.एस.आय.महाजन उपस्थित होते. शिशा बार अँड रेस्टॉरंट यांनी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे सदर आस्थापना कडून रु.१0,000 दंड वसूल करण्यात आला. सदर कार्यवाही बाजार व परवाना विभागाचे निरीक्षक आनंद काशीकर व लिपिक शुभम चोमडे, सागर अठोर,मनोज इतनकर यांचे पथकामार्फत करण्यात आली.