‘अश्‍वत्थ’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

    नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा सुपरस्टार स्वप्नील जोशीने आपल्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली असून, त्याच्या नवीन अश्‍वत्थ या चित्रपटाची घोषणा केली आहे. लोकेश गुप्ते दिग्दर्शित अश्‍वत्थ २0२२च्या हिवाळ्यात रिलीज होणार असून, या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर स्वप्नील जोशीने रिलीज करत असल्याची घोषणा केली.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    भगवत गीतेतील एका लोकप्रिय अशा ोकाच्या पार्श्‍वभूमीवर बेतलेला अश्‍वत्थचा टीझर आहे. संस्कृतमधील या ोकाचा ढोबळ अर्थ असा जेव्हा मनुष्य योगारूढ होतो, तेव्हा तो आपला उद्धार स्वत:च करतो आणि स्वत:च आत्मबलाच्या सार्मथ्यावर ऊंची गाठतो. त्याने आपल्या आत्म्याचे अध:पतन होवू देता कामा नये. मनुष्य स्वत:च स्वत:चा बंधू असतो आणि स्वत:च स्वत:चा शत्रू असतो.

    चौखूर उधळलेल्या घोड्याच्या पृष्ठभूमीवर सादर होणार्‍या या ोकानंतर टीझरमध्ये मराठी शब्द उधृत होतात. ते आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकारावर मात करून स्वाभिमानाने जगतो, तो अश्‍वत्थ. चित्रपटाचे निमार्ते आणि दिग्दर्शक या टीझरच्या माध्यमातून या चित्रपटाच्या एकूण कथेबद्दल एक कल्पना अधोरेखित करतात. त्यातून मग या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली जाते.

    या टीझरचा व्हीडीओ रिलीज करून स्वप्नील जोशीने आपल्या चाहत्यांबरोबर ही गोड बातमी शेअर केली आहे. तो म्हणतो, नवीन वर्ष, नवीन संकल्प! नांदी नव्या वषार्ची, नव्या संकल्पाची! नांदी. अश्‍वत्थची! प्रख्यात दिग्दर्शक लोकेश गुप्तेने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एक नवा मैलाचा दगड उभा करण्यास तो सज्ज झाला आहे. मकरंद देशपांडेचा आवाज टीझरमध्ये ऐकू येतो. त्यामुळे यात मकरंदसुद्धा आहे का, याबद्दलही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता ताणली गेली आहे. हा चित्रपट २0२२ च्या हिवाळ्यात रिलीज होणार आहे.