• Fri. Jun 9th, 2023

अनैतिक संबंधात मुलगा अडचण वाटू लागल्याने आईनेच प्रियकराच्या मदतीने संपवले

    जळगाव : अनैतिक संबंधाच्या आड येणार्‍या मुलास गळफास देऊन ठार मारल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली असून दोघांना कोठडीत रवाना केले आहे.

    सावखेडा शिवारात असलेल्या जलाराम नगरात विलास नामदेव पाटील हे राहतात. विलास पाटील हे चालक असून पत्नी मंगला पाटील आणि प्रमोद शिंपी यांचे वर्षभरापासून सूत जमले होते. त्यांच्या अनैतिक संबंधांमध्ये मुलगा प्रशांत पाटील हा अडसर ठरत होता.

    यामुळे आई मंगलाबाई आणि प्रमोद शिंपी यांनी मुलाला १६ जानेवारी रोजी रावेर येथून कबुतर ठेवण्याचा पिंजरा घेवून येवू असे आमीष दाखवत नेले. प्रशांत याला त्याची आई मंगलबाई आणि प्रमोद हे दोन्ही सोबत घेवून मध्यप्रदेशातील बर्‍हाणपुर गावानजीकच्या जंगलात घेऊन गेले. त्यांनी प्रशांत पाटील याला गळफास देवून झाडाला लटकावून दिले. तेथून ही महिला पुन्हा जळगावात घरी आली. इकडे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार प्रशांतचे वडील विलास पाटील यांनी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी हरविल्याची नोंद करण्यात आली.

    पोलिसांनी मयत प्रशांतच्या मोबाईलचे कॉल डिटेल तपासले असता प्रमोद शिंपी यांच्या मोबाईलवर वारंवार कॉल केल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक मदतीने प्रमोद शिंपी आणि मयत प्रशांत पाटीलचे लोकेशन एक असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरूवात केली.

    पोलिसांनी २६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता संशयित आरोपी प्रमोद जयदेवर शिंपी याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हय़ाची कबुली दिली. यासाठी मयत प्रशांतची आई मंगलाबाई पाटील याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांना अटक केली. पोलिसांनी बर्‍हाणपुर येथील जंगलातील घटनास्थळी जावून मुलाच्या मृतदेहाचा पंचनामा केला. दरम्यान, मुलाचा खून करणार्‍या दोन्ही संशयित आरोपींना गुरूवार २७ जानेवारी रोजी जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोघांना न्यायालयोन १ फेब्रुवारीपयर्ंत पोलिस कोठडी दिली आहे.या गुन्ह्याच्या तपासाकामी पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक नयन पाटील, सहाय्यक फौजदार वासुदेव मराठे, सतीश हाळणोर, भांडारकर यांच्यासह गुन्हेशोध पथकाने पर्शिम घेतले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *