- आई वात्सल्य गारवा
- ऊब पदराची छाया
- ऋतू मायेचा हिरवा
- तिची स्वार्थहीन माया
- आई क्षमेचे अंगण
- गुणी संस्कारी चंदन
- देई चुकीस ती माफी
- तिच्या पायास वंदन
- आई कष्ट रुपी झाड
- करी कुटुंबाची सेवा
- पोट खळगी भरण्या
- घाली अन्नरूपी मेवा
- आई भक्कम आधार
- झाकी पंखाची चादर
- आहे म्हणूनच जगी
- तिच्या बद्दल आदर
- आई संकटात धीर
- पाठी बनून ईश्वर
- मुला बनविते वीर
- जरी देह हा नश्वर
- आई शब्द येई मुखी
- थोडी लागताही ठेच
- तिची महती अपार
- सत्य वैश्विक रे हेच
- -युवराज गोवर्धन जगताप
- काटेगाव ता. बार्शी
- जिल्हा सोलापूर
- 8275171227