Recent in Technology

Advertisement

Breaking News

शब्दवेल साहित्य मंचाच्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन

    अमरावती : मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती मराठी विभाग व जाई फाउंडेशन मुंबई द्वारा संचालित शब्दवेल साहित्य मंच मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २६ डिसेम्बर २०२१ रोजी एक दिवशीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

    संमेलनाध्यक्षपदी प्रतिभाताई सराफ (ज्येष्ठ साहित्यिका),तर उद्घाटक म्हणून पुष्पराज गावंडे (युवा कादंबरीकार तथा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य) हे लाभणार आहे स्वागताध्यक्ष म्हणून मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सीमाताई देशमुख तर कार्याध्यक्ष म्हणून शब्दवेल साहित्य मंचाच्या सन्माननीय सल्लागार आदरणीय अंजलीताई ढमाळ असणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून आ.तेजराव पाचरणे (राज्यकर सह आयुक्त वस्तू व सेवा कर विभाग अमरावती) आ. मारुती रणदिवे (सहाय्यक राज्यकर आयुक्त वस्तू व सेवा विभाग मुंबई).आ. शामभाऊ ठक (अखिल भारतीय साहित्य मंच अध्यक्ष संस्थापक) डॉ. संयोगिता देशमुख (माजी प्राचार्य मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती) आ. डॉ. मंदाताई नांदूरकर (सुप्रसिद्ध साहित्यिक मराठी विभाग प्रमुख मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती) आ. ए.एच.चोरमुले (ठाणेदार गाडगे नगर पोलीस स्टेशन अमरावती) यांची उपस्थिती लाभणार आहे.

    संमेलनाच्या दिवशी सकाळी ८ वाजता ग्रंथ पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होत असून उद्घाटन सोहळा, दुपारी कथाकथन, निमंत्रितांचे कविसंमेलन, एकपात्री प्रयोग, पुरस्कार वितरण सोहळा असा रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन शब्दवेल साहित्य मंचचे अध्यक्ष प्रवीण बोपुलकर, सचिव अश्विनीताई अतकरे, उपाध्यक्ष शीतलताई राऊत, रंजनाताई कराळे व्यवस्थापक व प्रमुख कार्यवाहक प्रवीण सोनोने यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code