Header Ads Widget

निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा घोळ?-राज ठाकरे

    औरंगाबाद : निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा घोळ घातला गेला आहे का? असा संशय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ओबीसी आरक्षणाचा सगळा गोंधळ उभा केला जातोय, त्यातून यांना निवडणुकाचा पुढे ढकलायच्या आहेत असे दिसते, असा निशाणा राज ठाकरे यांनी साधला.

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या विविध प्रश्नांना राज ठाकरे यांनी मनमोकळी उत्तर दिले. यावेळी त्यांनी काही महत्त्वांच्या मुद्दय़ांकडेही लक्ष वेधले. ओबीसी आरक्षण, महापालिका निवडणूक, सचिन वाझे-अनिल देशमुख प्रकरण, कोरोना काळात ५ लाख लोकांनी देश सोडला, अशा महत्त्वांच्या मुद्दय़ांवर राज ठाकरे यांनी आपले मतं मांडली.

    ओबीसी आरक्षणाचा सगळा गोंधळ उभा केलाय, त्यामुळे या सगळ्यांची मतदारांकडे जाण्याची आता हिम्मत नाही. कारण मतदान मागायला येऊ नका, अशा पाट्या आता लागायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे काहीतरी कारण काढून यांना निवडणुका पुढे ढकलायच्या आहेत का? असा प्रश्न पडतो, असे राज ठाकरे म्हणाले.

    औरंगाबाद महापालिकेची निवडणूक तर सुमारे वर्षभर पुढे गेलेली आहे आणि ज्यांच्या पूर्वनियोजित आहेत, त्या निवडणुका होतील की नाही, त्याची खात्री नाहीय. की त्या अजून सहा-आठ महिने पुढे जातील, म्हणून हा सगळा गोंधळ उभा करुन इम्पिरिकल डेटावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये तू तू मैं मैं सुरु आहे. मग अशा स्थितीत निवडणुकीला कुणी सामोरं जाणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

    जर कामावर मतदान होत नसेल तर राजकीय पक्षांचा समज असा व्हायला लागतो की बाकीच्या गोष्टींवर लोक मतदान करतात. मग कामं करायचीच कशाला? त्या-त्या वेळी लोक शिव्या घालतील, निवडणुकीच्या वेळी दुसरा काहीतरी विषय पुढे आला की त्या विषयावर मतदान करतील. जोपयर्ंत मतपेटीतून लोकांचा राग व्यक्त होत नाही तोपर्यंत हे कुणाही सुधारणार नाही. निवडणुकीदरम्यान विकासाच्या मुद्दय़ांचा विसर पडत असेल तर मग विकास कसा होणार, कोण करणार?, असे राज ठाकरे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या