Header Ads Widget

सामाजिक सलोखा जपणे प्रत्येकाचे कर्तव्य - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

    अमरावती : अमरावती शहराने आजवर येथील संतांची संस्कृती जपली आहे. सामाजिक सलोखा जपणे प्रत्येकाचे कर्तव्य व जबाबदारी आहे. सेवा हा धर्म पाळल्यास आपण समाज एकत्र ठेवू शकतो, असे प्रतिपादन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

    लोकनेते व इतिहासकार कै.भि. दे. उर्फ बापूसाहेब कारंजकर स्मृती भवनाचे भूमिपूजन श्रीमती अँड. ठाकूर यांच्या हस्ते आज करण्यात आले.

    निळकंठ चौक स्थित स्मृती भवनाच्या दुमजली इमारतीच्या बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजना नगरोत्थान निधी अंतर्गत ६० लाखांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तसेच आवश्यकतेनुसार पुढील निधी मंजूर करण्याचे आश्वासन श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले.

    निळकंठ व्यायाम मंडळामार्फत शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह तसेच बापूसाहेब कारंजकर लिखित 'अमरावती इतिहासाचे खंड' यावेळी श्रीमती ठाकुर यांना देवून गौरविण्यात आले.नगरसेवक विलास इंगोले,नगरसेविका सुनीता भेले, नीलकंठ व्यायाम मंडळाचे अध्यक्ष प्रमोद गंगात्रे आदी यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या