Header Ads Widget

ने उजेडाच्या गावाले …

    ढोरामांग जाऊ नोको
    पोरामांग धावू नोको
    बजाराले जाऊ नोको
    पुढंमांगं पाहू नोको
    सुर्व्याच्या उजेडात
    रस्ता तुवा चोवून घे
    हात धरून समद्याले
    ने उजेडाच्या गावाले
    पाटी पेन्सील लिव्हनं सिक
    मंग गोबी भेद्र इक
    टिकली पिना फेकून दे
    पन पाटी पेन्सील पहलं घे
    झोपडी पल्ली पडू दे
    चूल इझली इझू दे
    आंबील सांडली सांडू दे
    पन पहिलं अक्षर लिवून घे
    ग्यानाची दिवलान घेऊन जा
    मनाची वात चेतवून जा
    आसेचं तेल टाकून जा
    पाटी पेन्सील घेऊन जा
    सावित्री सारखं सिकून जा !
    -उषाकिरण आत्राम
    [लेखणीच्या तलवारी]

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या