अमरावती :जिल्ह्यातील सर्व तालुक्यात आता पोस्ट ऑफिस व पोस्टमनच्या माध्यमातून नागरिकांच्या आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक करणे तसेच अद्ययावत करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
या सुविधेमुळे तालुक्यातील सर्व नागरिकांना आधारकार्डला त्यांच्या मोबाईल क्रमांक जवळच्या पोस्ट ऑफिस व पोस्टमनमार्फत लिंक करून घेता येईल किंवा पूर्वीचा मोबाईल क्रमांक बदलून घ्यावयाच्या असल्यास तोही बदलून घेता येईल. त्यामुळे ज्या शासकीय योजनांचा लाभ प्राप्त करण्यासाठी आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे किंवा लवकरच येऊ घातलेली “वन नेशन, वन रेशन कार्ड” (ONORC) सारख्या योजनेची अंमलबजावणी सहजपणे पार पाडण्यासाठी या सेवेचा उपयोग होईल. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ प्रबंधक शाखा यांनी पत्रकाव्दारे केले आहे.
0 टिप्पण्या