मुंबई : राज्य उत्पादन विभागाने जानेवारी २0२१ पासून २0 डिसेंबर २0२१ या वर्षभराच्या काळात १३३ कोटींपेक्षा जास्त किमतीची विदेशी दारू जप्त केली आहे.
२0२0 च्या तुलनेत २0२१ मध्ये झालेल्या कारवायांमध्ये लक्षणीय वाढ झालेले चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या सीमेलगतच्य़ा राज्यांमधून महाराष्ट्रात बंदी असलेल्या, किंवा इतर राज्यांमध्ये तुलनेत स्वस्त असलेली दारू तस्करीच्या मार्गाने महाराष्ट्रात आणल्या जातात. यात गोव्याहून येणार्या मद्याची संख्या सर्वात जास्त असते. २0२0 मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने ४३ हजार ११३ ठिकाणी छापे मारले होते, त्यात ९८ कोटी, १९ लाख १९ हजार ४१३ रुपयांची दारू जप्त केली होती. तर एकुण २७ हजार २८ लोकांना अटक करण्यात आली होती.
या वर्षी जानेवारी २0२१ पासुन १५ डिसेंबर २0२१ पयर्ंत ४४ हजार ८१३ ठिकाणी छापे मारण्यात आले, त्यात १३३ कोटी, ११ लाख ७२ हजार ५४८ रुपयांची दारू जप्त करण्यात आली होती, तर ३१ हजार ९४२ जणांना या वर्षभरात अटक करण्यात आली आहे.२0२0 आणि २0२१ च्या कारवायांची तुलना केली तर छाप्यांमध्ये ४ टक्यांनी वाढ झालीये, तर अटक करण्याची कारवाई १८ टक्यांनी वाढली आहे.. मुद्देमालाच्या किमतीचा विचार केला, तर गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी ३६ टक्क्यांनी जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या