गझल
किती काळ आम्ही प्रतीक्षा करावी
प्रयत्नास त्यांच्या सिमा का नसावी
कुणी यत्न करतो खातो कुणी मजेने
विषमता कशाने आता दूर व्हावी
पिता झाड लावी फळे नातवाला
श्रमाची महत्ता कुठे त्या कळावी
तिचे लग्न झाले कुण्या दूर गावा
इथे माय कष्टी मनाने झुरावी
नसे पुत्र पोटी तया रोज चिंता
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर
0 टिप्पण्या