Header Ads Widget

कॅरम खेळाच्या प्रसारासाठी कोलकाता ते मुंबई सायकलने प्रवास

    * अमरावतीकरांकडून कॅरमपटूंचे स्वागत

    अमरावती : कॅरम खेळाच्या प्रसारासाठी कोलकात्याहून सायकलने मुंबईला निघालेले दोन कॅरमपटू काल अमरावती येथे येऊन पोहोचले. क्रीडा अधिकारी व क्रीडाप्रेमी संघटनांनी शासकीय विश्रामगृहात छोटेखानी सत्कारसोहळा आयोजित करून त्यांचे स्वागत केले.

    पश्चिम बंगालमधील नॉर्थ परागणा क्षेत्र कॅरम संघटनेचे सचिव बेबर मंडल व राष्ट्रीय खेळाडू अग्नि बाग हे सायकलने कोलकात्याहून मुंबईकडे निघून ठिकठिकाणी कॅरम खेळाचा प्रचार व प्रसार करत आहेत. क्रीडा उपसंचालक विजय संतान यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. माजी जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक खंडारे, ॲथलेटिक्स संघटनेचे अतुल पाटील, कॅरम स्पर्धेचे संयोजक मेहंदी अली, क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर, श्याम देशपांडे, संतोष विघ्ने, अकिल शेख यांच्यासह अनेक कॅरमपटू व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या