अमरावती, दि.3: इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळातर्फे 20 टक्के बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना सुरू असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
यात महत्तम कर्ज मर्यादा 5 लक्ष रू.पर्यंत असून, राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातुन योजना राबविण्यात येते. लाभार्थी सहभाग 5 टक्के, महामंडळ सहभाग 20 टक्के, बँक सहभाग 75 टक्के असतो. महामंडळ सहभागावर व्याजदर 6 टक्के व परतफेड कालावधी 5 वर्षे असतो.
महत्तम कर्ज मर्यादा एक लक्ष रूपयांपर्यंत आहे. या योजनेत लाभार्थीला सहभागापोटी रक्कम द्यावी लागत नाही. परतफेड कालावधी 4 वर्षे असून, मुद्दलापोटी दरमहा 2 हजार 85 रूपये समान मासिक हप्त्यांमध्ये भरावे लागतात. नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येत नाही. थकित झालेल्या प्रत्येक हप्त्यांवर 4 टक्के व्याज दर लागतो. अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील व महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागासाठी 1 लक्ष रूपयांपर्यंत असावे. कुटूंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो.
महत्तम कर्ज मर्यादा 10 लक्ष रूपयांपर्यंत असून, उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास त्यातील व्याजाची रक्कम 12 टक्क्यांच्या मर्यादेत त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येते. परतफेडीचा कालावधी बँक निकषांनुसार लागू होतो.
महामंडळ निकषांनुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत) एलएलपी, एफपीओ अशा शासन प्रमाणीकरण प्राप्त संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणीसाठी कर्ज दिले जाते. त्या कर्ज रकमेवरील व्याज परतावा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जातो.
बँकेकडून प्रतिगटास कमीतकमी 10 लक्ष रू. ते जास्तीतजास्त 50 लक्ष रू.पर्यंतच्या मंजूर उद्योग उभारणीसाठी मंजूर कर्जावर 5 वर्षांपर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर जास्तीस जास्त 12 टक्के व्याज दराच्या आणि 15 लक्ष रू. मर्यादेत एकूण व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी व इमाव प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागाकरिता 8.00 लक्ष रू.पर्यंत. अर्जदाराने नियमित कर्ज परतफेड नाही केली तर व्याज परतावा दिला जात नाही.
अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी किंवा दूरध्वनी क्रमांक (0721) 2550339 किंवा ई- मेल dmobcamravati@gmail.com वर संपर्क साधावा. संकेतस्थळ www.msobcfdc.org वरही माहिती मिळू शकेल. महामंडळाचे कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात तळमजल्यावर स्थित आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या