अमरावती, दि.6: अमरावतीच्या शासकीय तंत्रनिकेतन अल्पमुदतीचे दोन नवे पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
त्यात ‘डिप्लोमा इन फॅशन आणि टेक्स्टाईल डिझायनिंग’ या पदविकेचा कालावधी दोन वर्ष असून, प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण अशी आहे. ‘ॲडव्हान्स डिप्लोमा इन एनर्जी मॅनेजमेंट अँड ऑडिट’ या पदविकेचा कालावधी एक वर्ष असून, प्रवेशासाठी पात्रता अभियांत्रिकी शाखेची कोणतीही पदविका किंवा पदवी किंवा विज्ञानशाखा पदवी आणि संबंधित क्षेत्राचा एक वर्षाचा अनुभव अशी आहे.
अधिक माहितीसाठी शासकीय तंत्रनिकेतन येथील अधिव्याख्याता ए. आर. भन्साळी यांच्याशी 9423426112 या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा मनोज भेंडे यांच्याशी 8623828151 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. व्ही. आर. मानकर यांनी केले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या