नवी दिल्ली : आगामी १जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे. कोविन प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ आर. एस. शर्मा यांनी ही माहिती दिली आहे.
याबाबत डॉ. शर्मा म्हणाले, आगामी १ जानेवारीपासून १५ ते १८वयोगटातील मुले कोविन पोर्टलवर नोंदणीसाठी पात्र असतील. यासाठी कोविन पोर्टलमध्ये नोंदणीवेळी ओळखपत्रासाठी दहावीचे विद्यार्थी ओळखपत्र सादर करता येणार आहे. कारण काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा इतर कुठलं ओळखपत्र नसू शकते. त्यामुळे त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच देशाला संबोधित करताना लसीकरणासंदर्भात तीन मोठ्या घोषणा केल्या. मोदींनी केलेल्या घोषणांनुसार, आता देशात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. तसेच १0डिसेंबरपासून आरोग्य कर्मचारी आणि ६0 वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोसही सुरु करण्यात येणार आहे.
गेल्या शनिवारी देशाला संबोधित केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी नववर्षाचे स्वागत सर्व ती काळजी घेऊन करण्याचे आवाहन केले होते. जगातील सर्वांत मोठ्या लसीकरण मोहिमेमुळे कोरोनाविरोधात भारताने यशस्वी कामगिरी केली आहे, याचा अभिमान वाटतो. आता आपल्याला आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार पाडायचा आहे. मुलांचे लसीकरण आणि डॉक्टर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस हा तो टप्पा असेल. तोही यशस्वी होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच आम्ही लसीकरणासंदर्भातील निर्णय घेतले आहेत. सध्या ओमिक्रॉनचा संसर्ग सुरू आहे. अनेक देशांत त्याचे निष्कर्ष वेगवेगळे आहेत. भारतातील शास्त्रज्ञही यावर बारीक नजर ठेवून आहेत.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या