Header Ads Widget

विसरले सगळे पण ..!

  विसरले सगळे पण मला
  अजूनही आठवतो
  तो वडिलांचं दुःखद दिवस,
  ती काळ रात्र, ती वेळ,
  मायेचा हृद्याला फुटलेला
  पाझर,
  आईचा अखेरचा श्वास..
  विसरले सगळे पण मला अजूनही आठवते...!
  त्यांचा लहानपणीचा
  हळवा स्पर्श,त्यांनी केलेलं संगोपन...
  त्यांचे आतुरलेपणा,
  माझ्या नजरेतला त्यांनी
  बघितलेले स्वप्न,
  त्यांनी केलेली मेहनत,
  पराकाष्ठा, त्यांचे हर्ष.
  विसरले सगळे पण मला अजुनही आठवते....
  त्यांच्या हळुवार मिठीपुढे
  तेव्हा ते वाटलं सोनेरी क्षण
  आता ते सगळे संदर्भ
  मला नेहमी त्रस्त करतात.
  बालपणीच्या विश्वात घेऊन जातात..
  आता थोड त्यांना विसरायला
  हवे.त्यांच्या आठवणीपासून
  जगण्यास थोड प्रयत्न
  करायला हवेत.
  पण ......
  मन माझ कुठ ऐकतं
  जेवढं विसरण्याचा प्रयत्न
  करतो तेवढीच त्यांची स्मृती
  माझ्या डोळ्यापुढे उभी राहते
  आठवणी ला उजाळा देऊन जाते
  विसरले सगळे पण मला अजूनही आठवते.....!
  -सुरेश बा.राठोड
  (कलाशिक्षक)
  मूळगाव. उमरी ई.(आर्णी)
  राष्ट्रीय विद्यालय, भिवापूर.
  जि. नागपूर.
9765950144

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या