Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात

    मुंबई : काळाच्या ओघात केंद्र, राज्य सरकारने एक ना अनेक कृषी योजना उत्पादन वाढविण्यासाठी राबवल्या आहेत. शिवाय अत्याधुनिक प्रणालीचाही वापर या क्षेत्रात होत आहे. हे सर्व होत असताना मात्र, शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यास हे सरकार अपयशी ठरत आहे. कारण सन २0२0 मध्ये देशात तब्बल ५ हजार ९७९ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले आहे. हा देशातला आकडा झाला तरी या काळात सर्वाधिक आत्महत्या ह्या महाराष्ट्र राज्यात झाल्या आहेत. २0१९ च्या तुलनेत यामध्ये घट झाली असली तरी काळाच्या ओघात होत असलेल्या बदलानुसार ५ हजार ९७९ हा आकडाही काही कमी नाही. कौटुंबिक समस्या, आजारपण, व्यसन, विवाह संबंधित विविध मुद्दे, संपत्तीचा वाद, व्यावसायिक समस्या अशा विविध कारणांमुळे शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे यांचे एनसीआरबीने आपल्या अहवालात म्हटले आहे.

    देशात दरवर्षी शेतकरीच आत्महत्या अधिकच्या असून याबाबत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनीच संसदेत ही माहिती दिली आहे. मात्र, यामागची कारणे त्यांनी स्पष्ट केली नसली तरी मध्यंतरी एनसीआरबी ने अहवाल प्रसिध्द केला होता. यामध्ये नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शेती नुकसानीच्या नैराश्यातून शेतकरी आपले जीवन संपवत असल्याचा उल्लेख होता. त्यामुळे एकीकडे आपण भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे म्हणत असलो तरी हे विदारक चित्र असलेली दुसरी बाजू आहे.

    देशात महाराष्ट्रात २ हजार ५६७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत तर यामध्ये मराठवाडा विभागात आत्महत्या अधिकच्या असल्याची नोंद एनसीआरबीने अहवालात म्हटलेले आहे. गेल्या दोन वषार्पासून निसगार्चा लहरीपणा आणि त्यामुळे शेती व्यवसयाचे होत असलेले नुकसान यामुळेच शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. याबाबत आत्महत्यामागचे कारण केंद्रीय कृषिमंत्री यांनी स्पष्ट केले नसले तरी एनसीआरबी यापूर्वी दिलेल्या अहवालात याची नोंद केलेली आहे. मराठवाड्यातील शेती ही पूर्णत: पावसावर अवलंबून आहे. यातच गेल्या दोन वषार्पासून निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान होत आहे. उत्पान्नात घट आणि वाढत चाललेला कर्जाचा बोजा यामुळे नैराश्यात असलेल्या शेतकर्‍यांनी हे टोकाचे पाऊल उचलेले आहे.

    २0२0 मध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या घटनांपैकी सर्वाधिक म्हणजे २ हजार ५६७ घटना ह्या महाराष्ट्रात घडल्या आहेत तर त्यापाठोपाठ कर्नाटक राज्यात १ हजार ७२, आंध्र प्रदेश ५६४, तेलंगणा ४६६, मध्यप्रदेश २३५, चंडीगढ २२७,उत्तर प्रदेशमध्ये ८७ तर तामिळनाडू राज्यात २0२0 मध्ये ७९, केरळमध्ये ५७7, आसाम १२ तर सर्वात कमी शेतकरी आत्महत्या ह्या मेघालय आणि मेझोराम राज्यात झाल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code