इत्यादी लोक आपापल्या मोहल्यात
सोशल डिसटंगसिंगनुसार
हजारो वर्षांपासून राहतात
अधूनमधून ठिणग्या उडाल्या गावात
पण सध्या बरं आहे !
गावात येताना दोन-तीन गेट आहेत
गेटच्या बाजूलाच
शासनाच्या तंटामुक्त , हागणदारीमुक्त
अशा पुरस्कारांचे मोठमोठे फलक आहेत.
अलीकडेच गावाला
शासनाचा आदर्श ग्राम पुरस्कार मिळाला
त्याचाही फलक आधीच्याच फलकांपाशी
सरपंचाने लावून घेतला .
काल गावी गेलो
नि त्या नव्या फलकापाशी
नुसताच घुटमळत राहिलो
सेल्फी काढून फेसबुकवर टाकावी
जातीवर नाहीतर फलकावर कविता लिहावी
तिला ' महासत्ता ' वगैरे असंच काहीसं
नाव द्यावं ; असं मनात आलं .
काळ किती वेगानं पुढं गेलाय
मोहल्ले अजूनही एकमेकांपासून दूरच
डोकं खाजवलं
परत परत घुटमळलो
नि वाऱ्याच्या वेगानं
माझ्या शहराकडे निघालो !
-------------------------------------------------------
प्रा .डॉ .सुरेश खोब्रागडे
लाखनी जि .भंडारा
भ्र.९३७३७११४३२
-------------------------------------------------------
0 टिप्पण्या