Recent in Technology

Advertisement

Breaking News

वन बेडरूम फलाट

    गनपत वन बेडरूम फलाट मंदी बायको,पोरासंग राहत व्हता. मस्त खुसीची जीदगानी जगत व्हता.पोराले उच्च शिक्षन देल्लं. गनपत शायेत चपराशी व्हता. ईमानदारीन नोकरी करे कोनाच्या घेन्यात ना देन्यात. पोरगं मोठ झालं थो लय मोठे मोठे सपन पाये. त्याले वाटे कां येथं काई ठिवलं नाईपरदेशात जाऊन नोकरी कराची, अन पैसा कमवाचा थेच त्याच्या डोक्सात भरलं. दोन तीन वर्ष त्यान नोकरी करुन पैसा जमवला. अन् मंग परदेशी जाचं ठरुलं. माय बाप सांगू सांगू थकले. पन नाई मले जाच मनजे जाचच. तुमी राहा इथंच वन बेडरूम फलाट मंदी. बाप मने अबे लेका तू येथच लायनाचा मोठा झाला. शिक्षन, खानपान सारं इथंच झालं अन या जनम भूमी ह्यो भारत देश सोडून चालला. तुले कंटाया आला...माय बापाचे डोये भरुन आले..जाय तुले कोठं जाचं हाय तेथं..आखीर पोरगं माय बापाचा निरोप घिवून परदेशी निंगून गेला....!!

    माय बाप डोक्सावर हात ठेवून मुसुमुसू रडू लागला..पोरगं परदेशात गेलं येका चांगल्या कंपनीत त्याले नोकरी भटली. गेल्याच्या बाद काई दिस माय बापाले दो-तीन दिन बाद फोन करे,खुशहाली दे..माय बापाले लय छान वाटे..दोघ्याबी फोन ची आतुरतेन वाट पाये.. असं काई दिस चाले..येक दिस फोन वाजला माय बाप आनंदान फोन उचलला..पोरानं खुशखबर देल्ली..माय म्या लगीन करत हावो..माय बापाच्या पाया खालची जमीन खचकली..बोलाले शब्द फुटेना..बाप म्हनं पोरा ह्यो का करत हाय..तुये मायबाप हयात हाय ना लेका ? लय हताश होऊन पोराले आशीर्वाद देल्ला जमन तवा सुनबाई ले घिवून येजो पानी भरल्या डोयानं सांगलं, अन फोन ठिवला. पोरगं परदेशात मस्त व्हता.. आता संसारात रमला. हयुहयु मायबापा ले फोन करन कमी झालतं..काई दिसान पुनाहुन येक खुशखबर भेटली..का त्याले पोरगं झालं. मायबाप लयच खुश झालते..कदी नातवाले पायले भेटन याच आशेवर जगत व्हते.. पोराले मने लेकरा येकडाव तरी सुनेले नातवाले घिवून येजो..पोरान काई मनावर घेतलं नाई..

    इकडं मायबाप वाटेकडे डोये लावून बसले व्हते. पोट्याच्या आठवनीत खंगत चालले व्हते.. तिकडं त्याच पोट्ट मोठं झालं.मायबापाले काई गिने नाई.. नवरा बायको मंदी झगडा चालू झाला.. बायको घर सोडून निंगून गेली..पोट्टी बी गेलं..अता बसलं पोरगं येकटं..इचार करु करु त्याले येकटपन अन घरं खायले धावे.. तवा त्याले मायबाप आठुले..अन त्यान मायबापाकडं जाच ठरुवलं..इचार करत व्हता तेवढ्यात त्याचा फोन खणाणला.. त्यानं पायलं फोन इंडीयाचा दिसते.. फोन उचलला हॅलो तिकून आवाज आला रमेश म्या नागपूरहून तुया शेजारी देशपांडे काका बोलत हावो..काल रातच्यान तुये मायबाप दोघे बी गचकले..देवा कड गेलं..आमी फलाट च्या लोकाईन चंदा गोया करुन त्याईचा अंतीम संस्कार केला..त्याईच्या फोन मंदी तुया नंबर भेटला..मनुन तुले सांगितलं.. असं मनुन देशपांडे काकान फोन ठिवला.. रमेश सुन्न होऊन खुरसीत बसला.. त्याचं सुक दु:क येकून घ्यायले कोनी त्याच्या जवय नव्हतं ढसाढसा बोंबलत रायला..माय बापाले आठवतं रायला..आखीर येक दिस रमेश इंडीयात नागपूर ले वन बेडरूम फलाट मंदी परतला..दार उघडून आत आला मायबापाच्या फोटु कडं पावून हंबरडा फोडला अन माफी मांगीतली.. आपला वन बेडरूम फलाट लई छान हाय, सुक ,शांती ,समाधान, हाय इथं.. म्या पैशाच्या लालच मंदी बहुत गलती केली..आता माहे डोये उघडले, पन म्या माहे मायबाप खोवले.. तवा पासून पुनाहुन रमेश वन बेडरुम फलाट मंदी राहू लागला..

    सौ हर्षा वाघमारे
    नागपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code