Header Ads Widget

चांदोबा चांदोबा (बालगीत)

    चांदोबा चांदोबा
    आकाशी बसतो
    कला तुझी भारी
    लपून हसतो
    ढगांमध्ये तुझे
    मोठे घर खास
    बंगल्या भोवती
    चांदण्यांची रास
    खेळ लपाछपी
    खेळण्या हुशार
    थोडे तोंड डावी
    लगेच पसार
    पंधराच दिन
    होतो मोठा मोठा
    कोणत्या चक्कीचा
    खातो तू रे आटा
    मला सांग बाबा
    झोपतो की नाही
    सदा चाले तुझी
    पळण्याची घाई
    तुझ्याशी खेळणे
    आवडेल मला
    येतोस का खाली
    मला तू न्यायला
    करशील का तू
    माझ्याशीच गट्टी
    म्हणालास नाही
    मी करेन कट्टी
    -युवराज गोवर्धन जगताप
    काटेगाव ता. बार्शी
    जिल्हा सोलापूर
    8275171227

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या