Header Ads Widget

राज्यात २७ डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम

    पुणे : हिमालयात बर्फवृष्टीसह पाऊस सुरू झाला आहे. एकाच वेळी दोन पश्‍चिमी चक्रवात सक्रिय झाले आहेत. संपूर्ण उत्तर भारतात पाऊस आणि जोडीला थंडीची लाट आली आहे. काही ठिकाणी किमान तापमान शून्याच्याही खाली गेले आहे. महाराष्ट्रात २७ डिसेंबरपयर्ंत थंडीची तीव्र लाट कायम राहणार आहे. नागरिकांना हवामानशास्त्र विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, राज्यातील काही शहरांचे किमान तापमान यंदाच्या हंगामात प्रथमच दहा अंशांखाली गेले. नागपूर येथे ७.६ अंश तापमान नोंदविले गेले.

    जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांत अतितीव्र थंडीची लाट सक्रिय झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रही गारठला आहे. राजस्थानातील चुरू आणि सिकरमध्ये सर्वांत कमी किमान तापमान (उणे 0.५ अंश सेल्सिअस) इतके नोंदविले गेले. आगामी दोन दिवसांत देशाच्या मध्य व पूर्व भागांसह महाराष्ट्राचे किमान तापमान आणखी २ ते ४ अंशांनी घटणार आहे. हवामानशास्त्र विभागाने जारी केलेल्या विशेष बुलेटीनमध्ये म्हटले आहे की, उत्तर भारतात एकापाठोपाठ दोन पश्‍चिमी चक्रवात (वेस्टर्न डिस्टर्बन्स) तयार झाल्याने संपूर्ण देश गारठला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या