Header Ads Widget

घरगुती गॅस सिलिंडरचे वजन कमी होणार.!

    नवी दिल्ली : मोदी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरचे वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंलेडरचे वजन १४.२ किलोग्रॅम असल्याने त्याच्या वाहतुकीला विशेषत: महिलांना मोठा त्रास होतो.

    याबद्दलची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी राज्यसभेत बोलतांना माहिती दिली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात गॅस सिलेंडरचे दर ९00 रुपयांच्या वर आहेत. तर दिल्लीमध्ये १४ किलो एलपीजी गॅस सिलिंडरचे ८९९.५0 पैसे इतके आहेत.

    ऑक्टोबर महिन्यानंतर सिलिंडरच्या किंमती स्थिर असल्या तरी गॅस दरवाढीमुळे देशभरातील ग्राहक त्रस्त आहेत. अशा ग्राहकांना कंपोझिट सिलिंडरमुळे दिलासा मिळणार आहे. १0 किलोचे कंपोझिट सिलिंडर ६३३.५0 रुपयांना तर ५ किलोचे कंपोझिट सिलिंडर ५0२ रुपयांना मिळणार आहे. दिल्लीसह २८ शहरात एलपीजी कंपोझिट सिलिंडर मिळणार आहेत. या सिलिंडरचे वजन आधीच्या सिलिंडरपेक्षा कमी आहे. त्या सिलिंडरची किंमत ६३४ रुपये इतकी असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या