Header Ads Widget

निळ्या नभाखाली

    काळोखातील माणसे बाबा
    आता उजेडात आलीत
    झोपलेली माणसे बाबा
    आता जागी झालीत
    बंदिस्त पाखरे बाबा
    नभी मुक्त उडू लागलीत
    तुम्ही सांगीतलं शिका
    तसे सर्वच शिकू लागलेत
    तुम्ही सांगीतलं संघटीत व्हा
    तसे सारेच संघटीत झालेत ?
    तुम्ही सांगीतलं संघर्ष करा
    सारेच तो ही करू लागलेत
    पण अर्थ न कळल्याने
    एकमेकावर कुरघोडी करू लागले,
    कुवतीनुसार निळ्या नभाखाली
    प्रत्येकजन आपलं घर बांधू लागला,
    हल्ली त्याच नभाचा एक भाग होता यावं
    म्हणून प्रयत्न करू लागला
    मनात येईल तो वाटणी मागू लागला.
    एक युवक त्याला श्याल्यूट करू लागतो
    हृदयातून त्याचा सन्मान करू लागतो
    आज नाना रंगासह तो गर्दित दिसतो
    एखाद्या काडीवर, माडीवर, गाडीवर
    गुदमरल्यासारखा भासतो
    तो युवक त्याची व्यथा जाणतो
    मग ओरडून लोकांना सांगतो
    अरे ! सोडवा त्याला त्यांच्या कचाट्यातून ...
    वाचवा जळत्या घराला त्या फुफाट्यातून...
    पण त्याचा आवाज घोषणात विरून जातो.
    मग तो बोलणा-या माईकचा वायरच कापून टाकतो,
    हळूच त्याला खांद्यावर घेत माघारी फिरतो,
    तशी सभेतील गर्दी त्याच्या मागे चालू लागते
    आता तो पुढे चालत असतो, लेफ्ट राईट,
    करीत गावागावातून निळ्या पाखरांसंवेत
    'कमांडो आगे बढ ' चा आदेश देत !
    अरुण विघ्ने

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या