Recent in Technology

Advertisement

Breaking News

शोकाकुल देश

  एका क्षणात लष्कराच्या
  हेलिकॉप्टरचा झाला घात
  एक नव्हे एकूण तेरा
  दिग्गज ठार झाले त्यात
  शोकाकुल झाला देश
  दुःख सागरात बुडाला
  तडा कसा गेला असेल?
  कणखर अभेद्य गडाला
  जंग जंग पछाडणारे
  सापडले कसे जाळ्यात?
  विरश्रीची माळ असायची
  नेहमीच त्यांच्या गळ्यात
  दृश्य पाहूनच काटा यावा
  सारं अंग शहारून जावं
  होत्याचेही नव्हते झाले
  ओसाड संसारांचेही गावं
  गर्जनेने हादरुन सोडणारा
  सिंह होता बिपिन रावत
  शत्रुंच्या अंगावरती मोठ्या
  धाडसाने जायचा धावत
  -पी के पवार
  सोनाळा बुलढाणा
  ९४२१४९०७३१

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code