नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसच्या तिसर्या लाटेचा धोका वाढला आहे. एवढेच नाही, तर दिल्ली, मुंबई आणि बिहारने तिसरी लाट सुरू झाल्याचेही मान्य केले आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. देशात काल कोरोनाचे १३ हजार १५४ नवे रुग्ण समोर आले. मंगळवारच्या तुलनेत हा आकडा तब्बल ४३ टक्कयांनी अधिक होता. तर दिल्लीत ९२३ आणि मुंबईत २,५१0 कोरोनाबाधित समोर आले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास ओमिक्रॉनला जबाबदार मानले जात आहे.
ओमिक्रॉन व्हेरिअंटचा प्रसार इतर प्रकारांच्या तुलनेत अधिक वेगाने होतो. यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या तिसर्या लाटेचा धोकाही वाढला आहे. एवढेच नाही, तर दिल्ली, मुंबई आणि बिहारने तिसरी लाट सुरू झाल्याचेही मान्य केले आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत सांगितले की, दिल्लीत समोर येणार्या नव्या रुग्णांमध्ये ४६ टक्के नवे रुग्ण हे ओमिक्रॉनचे आहेत. या पूर्वी ओमायक्रॉनचा संसर्ग केवळ परदेशातून येणार्या प्रवाशांमध्येच दिसत होता. मात्र, आता तो इतर लोकांमध्येही झाल्याचे दिसत आहे. यामुळे आता ओमिक्रॉनचे कम्युनिटी स्प्रेड व्हायला सुरुवात झाली असल्याचे मानले जात आहे.
सत्येंद्र जैन म्हणाले, ओमिक्रॉन वेगाने पसरत आहे, परंतु इतर प्रकारांच्या तुलनेत तो कमी गंभीर आहे. ते म्हणाले, काल ९२३ रुग्ण समोर आले, पण एकही मृत्यू झाला नाही. तसेच केवळ २00 लोकांनाच रुग्णालयात दाखल करण्याची गरज होती. यांपैकी ११५रुग्ण असे आहेत ज्यांना खबरदारी म्हणून ठेवण्यात आले आहे.
0 टिप्पण्या