Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

विषय

कितीही 
पैलू पाडले तरी चकाकत नाही कर्तृत्वाचे हिरे 
सूर्याची किरणं नेमानं 
कोण ठेवतय झाकून सातत्यानं..?

टिन-टपरांनी 
बघ कित्ती वधारलाय आपला भाव 
भंगारी आणतात 
रत्नांच्या वखारी सांभाळण्याचा आव...

सोने जाळूनही 
का होत असावा नुसताच कोळसा...

कापणीचे विळे 
किती वर्षांपासून घासले नाहीत आपण..??

आपल्या 
त्याग-समर्पण-निष्ठांच्या त्रिरत्नांचे 
अवमूल्यन कुणी केले..?
हाच संशोधनाचा विषय.. !!

-------------------------------------------------■संजय ओरके

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code