Header Ads Widget

प्रेम म्हणजे जीवन बरबाद करणं नव्हे.!

  युवक-युवतींचे प्रेम हे केवळ शारीरिक आकर्षण असते. प्रेम करण्यासाठी पोक्तपणा यावा लागतो.तो केवळ स्वाध्यायाने प्राप्त होतो.खलनायक व हिरो दोघेही मुलींना छेडण्याचेच काम करतात. दोहोंमध्ये मला भेद दिसत नाही. मुली शक्यतो लफंग्यांवर प्रेम करतात कारण तेच त्यांच्या मागे लागून त्यांना छेडत असतात. सरळमार्गी मुले ही कधी मुलींच्या पसंतीस पडत नसतात. मुलींना व्हिलनच आवडतात.

  अलिकडे प्रेम वाढलं आहे. पण हे वाढलेले प्रेम हे स्वार्थासाठी असून ते प्रेम हे काही खरं प्रेम नाही. परंतू आपल्याला ते माहित नसल्यानं आपण त्याच प्रेमाच्या पाठीमागं धावत असतो. आपल्याला हे माहित नसतं की हे प्रेम कोणत्या थराला नेवून सोडेल.प्रेमाच्या परीभाषेत महाविद्यालय जीवनाचा विचार केल्यास एक तरुण एका आपल्याच महाविद्यालयातील करुणा प्रेम करतो. तिही त्या तरुणावर विश्वास ठेवून त्या तरुणाच्या जाळ्यात पडते आणि हे तिला जाळ्यात ओढून घेत असतांना तिला तो तिच्यासोबत विवाह करेल असे आश्वासन देतो. असेच आश्वासन देवून तो वारंवार तिच्यावर बलत्कार करीत असतो. पण ज्यावेळी ती गरोदर असते. त्यावेळी ती त्याला सांगते की मी तुझ्या बाळाची आई होणार आहे. तेव्हा तो विचार करतो. विचार करतो की हे काय झिंगट आपल्या पाठीमागं लागलंय. शेवटी काही काही मुलं विवाह करतात. पण काहीकाही मुलं हे अगदी स्पष्ट सांगतात की तू तुझं पाहून घे. मी टाईमपास केला. तेव्हा मुलींना फार वाईट वाटतं. काही तर आत्महत्या करतात.

  काही मुली या संयमी असतात. त्या त्यातून बोध घेवून सुधरतात. ही गोड बातमी असली तरी त्याची बदनामी करणारी बातमी असते. त्यातच त्या मुली त्या बाळाला गर्भपात करुन पाळून टाकतात तर काही मुलींचे जेव्हा गर्भपातानं बाळ पडत नाही. त्या संयमी मुली दूर अशा ठिकाणी जावून आपल्या बाळास जन्म देतात व गुपचूप कोणाला दान देतात. तर काही निर्जन अशा ठिकाणी त्या बाळांना काळजीनं ठेवून देतात. त्यातच ते दुरुन पाहात असतात. कोणी कुत्रं मांजर आपल्या बाळाला क्षति पोहोचविणार तर नाही. काही मुली ह्या त्या बाळाला सोडून येतात. तर काही मुली ह्या त्या बाळाला पाप समजून कच-याच्या डब्यात किंवा विहिरीत फेकून देतात. असे कितीतरी जीवंत बाळ कच-याच्या ढिगा-यात सापडतात. त्यांचे हात, पाय बोटं कुत्र्यानं तोडलेले असतात. काही मुली तर त्याच्याही पलिकडे असतात. त्या मुली त्या त्या बाळाचा जीव घेवून वा त्याला जीवंत असतानाच जमीनीत गाडून टाकतात. जे वाचतांनाही वा ऐकतांनाही डोळ्यात अश्रू तरळतील. परंतू ह्या सत्य घटना आहेत.

  आज फेसबूकचं जग आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअपच्या ग्रुपपवर सर्व मुलींचे सुंदर सुंदर फोटो असतात. ते फोटो पाहून काही अनोळखी मुलं हे विनंत्या पाठवीत असतात. त्यातच मुली फसतात आणि मग वर सांगीतल्याप्रमाणं अगदी चित्रपटातील कथानकासारखं घडतं.आज आपले सांगणारे व आपले मानणारे मुलं फार कमी प्रमाणात मिळत असतात. मग अशा मुलांपासून मुलीनं सावध राहायला पाहिजे. प्रेम म्हणजे जीवन बरबाद करणं नव्हे याचा विचार करायला पाहिजे. प्रेमात सर्व जायज असते हे बरोबर आहे. पण प्रेम करतांना सावधान असण्याची गरज नाही का? खरं प्रेम हे विवाहानंतरच असतं. त्या पुर्वीचं प्रेम हे काही खरं नाही. शक्यतो अपवादात्मक एखादंच प्रकरण असं निघेल की ज्यात नायक हा मित्र असेल. परंतू शक्यतोवर तसं घडत नाही. म्हणून भोळ्याभाबड्या मुली फसतात.

  काही मुलंही फसतात. आजच्या मुलामुलींना कोणाच्या चांगल्या मार्गदर्शनाची गरज वाटत नाही. चांगलं मार्गदर्शन हे कोणीही सांगीतलं तरी ते त्यांना पटत नाही. मग ते आईवडील का असेना. मात्र कोणीही मार्गदर्शन सांगत असेल तर तो त्यांचा अनुभव असतो. त्यानं जग पडताळलं असतं वा अनुभव घेतलेला असतो. ज्यावेळी संकट येतं. त्या संकटात आपल्यालाच मार्ग काढावा लागतो. कोणी आपल्याला मदत करीत नाही. मायबापही नाही. म्हणून कोणावरही प्रेम करीत असतांना आजच्या मुलामुलींनी विचार करुनच प्रेम करावं. कारण त्यानंतर जे घडतं. ते अतिशय वेदनादायकच घडतं. जरी आपण प्रेमविवाह केला तरी त्याच्या वेदना आपल्याला आयुष्यभर छळत असतात. कोणी कोणी नात्यातील व्यक्ती जीवनभर सोबत घेत नाही. आज समाज बदलला तरी.

  प्रेम करतांना आणाभाका घालणं सोपं आहे. कोणत्याही प्रेमवीराला ती सुंदर आहे असंच वाटतं. त्यातच कोणत्याही मुलीला त्याच्यात आदर्श पुरुषच दिसतो. पण जेव्हा संकट येतं, तेव्हा त्याचं अक्राळविक्राळ स्वरुप दिसून येतं. विशेष आणि महत्वाचं म्हणजे जीवन जगतांना आपल्याला समाजाची गरज असते. ती गरज आपण प्रेमविवाह केल्यानंतर पुर्ण होत नाही. कारण समाज हा आपण प्रेमविवाह केल्यानंतर आपल्याला धुत्कारत असतो.

  आपलं प्रेम हे आपलं जीवन घडविणारं असावं, बरबाद करणारं नसावं. त्यात स्वार्थभावना नसावी. समाजहितोपयोगी भावना असावी. तसेच एकदा का आपण कोणावर प्रेम केलं, तर त्या प्रेमाला संपुष्टात आणू नये वा संपुष्टात आणण्यासाठी प्रेम करु नये. तसेच ज्या प्रेमात धोकादडी असेल, असे प्रेम कोणीही कोणावर करु नये.

  अलिकडे असंच प्रेम होत असतं. विशेषतः महाविद्यालय तरुण तरुणी हे एकमेकावर प्रेम करतांना केवळ शारिरीक आकर्षणाची तृप्ती म्हणून प्रेम करीत असतात. ती तृप्ती करण्यासाठी ते एकमेकांचा वापर करीत असतात. तो वापर झाला की बस झालं, विवाह करण्याची गरज नाही असं ते मानत असतात. त्यासाठीच त्यांचं प्रेम असतं. असं प्रेम करीत असतांना व शारिरीक तृप्ती करुन घेत असतांना मित्र, मैत्रीणी, मायबाप यांना माहित नसते. परंतू त्यातून जेव्हा संभाव्य घटना घडते. ती घटना आईवडील, इष्टमित्र यांना पश्चाताप करणारी असते. इष्टमित्र हे फक्त क्षणापुरतं दुःख व्यक्त करतात. परंतू खरं दुःख त्यांनाच होतं, जे त्यांचे मायबाप असतात.

  प्रेम करा. प्रेम करायला मनाई नाही. पण......प्रेम करतांना व प्रेमात पडतांना ज्या कुणावर आपण प्रेम करतो, तो किंवा ती......ते दोन्ही घटक किती चांगले आहेत. याची पुष्टी करुन घ्यावी. केवळ शारिरीक आकर्षण पुर्ती म्हणून प्रेम करु नये. त्यात पुढील जीवनाचा ओलावा असावा. तसं जर प्रेम करीत असाल, तर ते प्रेम तुमचं आयुष्य बरबाद करणारंच प्रेम असेल. दुसरा काहीच त्यातून अर्थ निघू शकत नाही.

  अंकुश शिंगाडे
  नागपूर
  ९३७३३५९४५०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या