अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी हायस्कूल,भानखेडा बु., जि.अमरावती येथे दि.२५ डिसेंबर ,२०२१ ला शिक्षणमहर्षी डाँ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२३ व्या जयंती उत्सव व स्नेहसंमेलनाचा समारंभ मा.अशोकराव गावंडे (अध्यक्ष ,शाळा समिती, श्री शिवाजी हायस्कूल,भानखेडा बु.) यांच्या अध्यक्षतेत संपन्न होणार असून उद्घाटक मा. अार. बी. काळे (माजी मुख्याध्यापक ,आजीवन सभासद,श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती) आहेत. सुप्रसिद्ध कवी,लेखक व समाजप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बुंदेले यांचे "विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान डाँ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख " या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रमुख अतिथी मा.दिवाकरराव देशमुख (आजीवन सभासद, श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती) मा.सौ.वनिताताई ठाकरे (सरपंच, ग्रा.पं. ,भानखेडा) ,मा.संजय बाबरे (केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक ,जि.प.पु.मा.शाळा,भानखेडा) मा.प्रा.भय्यासाहेब मेटकर , मा.बाबुरावजी शेळके ( माजी मुख्याध्यापक) ,मा.नारायण महिंगे (उपसरपंच, ग्रा.पं, भानखेडा), मा.तुषार पळसकर (पोलीस पाटील, भानखेडा) हे आहेत.
दि.२७ डिसेंबर ,२०२१ पर्यंत असलेल्या जयंती उत्सव व स्नेहसंमेलनामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.कोरोना नियमाचे पालन करुन सर्व कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापिका कु.एम.बी.निचळ यांनी सांगितले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सहा.शिक्षिका कु.एस.अो. धवने,श्री अतुल ठाकरे सर, श्री पी. पी.ठाकरे सर, कु.जयाताई ठाकरे ,श्री बागडे , श्री विलास ठाकरे अथक परिश्रम घेत आहेत.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या