Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

कोवीडमुळे पालक गमावलेल्या बालकांना सानुग्रह मदतीचा लाभ तातडीने द्यावा - जिल्हाधिकारी

    यवतमाळ : कोवीडमुळे पालक गमावलेल्या सर्व बालकांना शासनाच्या सानुग्रह मदतीचा लाभ मिळाला का, त्यांची माहिती पोर्टलवर अपलोड झाली का, मदतीसाठी त्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत का अशी विचारणा करून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व लाभार्थ्यांना तातडीने सानुग्रह अनुदान देण्याचे व त्यासाठी आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले.

    कोविड आजाराच्या पार्श्‍वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दलाची बैठक आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा माहिला व बालकल्याण अधिकारी ज्योती कडू, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम.आर.ए.शेख, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, कौशल्य विकासच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शुभांगी आगाशे, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अँड. सुनिल घोडेस्वार, जिल्हा बाल संरक्षक अधिकारी देवेंद्र राजुरकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रमोद सुर्यवंशी, माविमचे डॉ. रंजन वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी येडगे पुढे म्हणाले की जिल्ह्यात कोरोनामुळे आतापयर्ंत एकूण १७८८ मृत्यूची नोंद आहे. मृतकांच्या कुटुंबीयांना वारस म्हणून कायद्यानुसार मालमत्ता मिळाली आहे किंवा कसे याबाबत प्रत्यक्ष त्यांचेपयर्ंत जावून माहिती घ्यावी व अडचणीचे ठिकाणी आवश्यकतेनुसार कायद्याचे सहाय्य त्यांना देण्यात यावे. कोविडमुळे पालक गमावलेल्या सर्व मुलांशी संपर्क साधून त्यांना काही अडचण असल्यास त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे तसेच त्यांची माहिती जतन करून ठेवावी जेणेकरून भविष्यात त्यांना गरज पडल्यास मदत करता येईल. यावेळी कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांसाठी कौशल्य विकास योजनेंतर्गत शिलाई मशीन ची योजना मंजूर करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

    महिला व बालकल्याण विभागाच्या इतर योजनांचा आढावा घेतांना बालके दत्तक घेण्यासाठी कायद्यानुसार विहित मार्ग अवलंबविणे, बालविवाह होऊ नये म्हणून जनजागृती करण्याचे तसेच शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून त्यांना पुन्हा शाळेत घेण्यासाठी मोहिम राबविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी दिल्या.यावेळी बालविवाह न करण्याबाबतचे जनजागृतीपर पोस्टरचेही प्रकाशन जिल्हाधिकारी यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बैठकीला अँड. प्राची निलावार, अँड. संजू गभणे, महेश हळदे, स्मिता पेटकर, निरज नखाते, राम हळदे, श्री. जुमळे, स्वप्नील इसळ, दिलीप दाभोडकर, र.श.जतकर, अनिल शेंडगे, स्वप्नील बोकसे व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code