Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

अभिवादन

    बाबासाहेब यातनाना कवटाळून अन्यायाला झुंज देवून तुमचा तो लढावू बाणा
    त्याला माझे अभिवादन आज
    .....वर्णवादी धर्मसत्ताक संस्कृती तुम्ही केली बिनदिक्कत चिरफाड
    अन! दावले सत्य
    त्या दिव्य ज्ञानास
    माझे अभिवादन आहे.
    मानवतेचा मंञ दिलाअन,
    खुले केले महाड चवदार तळे
    काळाराम मंदिर,नाशिकचे
    या मानवता सघर्ष लढ्यास
    माझे अभिवादन आहे
    तुम्ही उपसला हा विषमतेचा गाळअन! एकमेव बाबा सामाजिक क्रांती लढ्याचे
    गावकूसाबाहेरील वस्त्यांचे
    तमाम उपेक्षितांच्या स्वाभिमानाचे तूम्हीच युंगधर झाले बाबा!
    माझे अभिवादन बाबा
    या विखारी धर्मात कुठे माणूसकी सारी जहरी जातीयता पोसलेल्या
    याचा केला त्याग अन!त्या नागपूरच्या बौध्द धम्माची
    दिक्षा घेतली तुम्ही अन!पाच लाख लोकांना दिली धम्मदिक्षा माझे अभिविदन बाबा,
    ......भारत देशा एकञ करन्या अन,सारी राष्ट्रिय एकात्मता जपन्या हरेकाला न्याय देन्या
    दिले संविधान स्वातंञ्प समता बधूता ही तत्वे बूध्दाची दिली अन देश केला महान या भारत रत्नास नव्हे या विश्वरत्नास माझे अभिवादन आहे
    तुंम्ही कसे गेले बाबा
    आज आम्ही सैरभैर झालो
    दिशा दिशात तूम्हीच तूम्ही
    आज हरकाच्या ओठी बाबासाहेब तूंम्ही आहात
    तूम्ही एकवटली सारी जनता
    तशी आता कधी एकञ येणिर आहे मी वाट पाहते कधीची
    आजदिनी तरी तुझा एकिचा मंञ कधी जपतील बाबा
    हे खरे अभिवादन होईल तुम्हास आज माझे बाबा तूम्हास हे भावभिनी अभिवादन आहे अभिवादन आहे
    -प्रतिभा प्रधान
    मोबा'7०57605968
    अमरावती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code