अमरावती : दत्त प्राथमिक विद्यामंदिर बार्शी व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी या दोन्ही शाळेत दि:-१७/१२/२०२१ वार शुक्रवार रोजी माता पालक मेळावा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पालक सौ राणी पवार प्रमुख पाहुण्या सुबाबाई काळे,शांताबाई मोरे या उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली जेष्ठ माता पालक व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांच्या प्रगती बाबत तसेच गुणवत्तेबाबत , आरोग्याबाबत , मातापालकांशी सुसंवाद साधण्यात आला.आपल्या पाल्याच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी शिक्षकांना पालकांनी सहकार्य करावे ही अपेक्षा शाळेकडून व्यक्त करण्यात आली.मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत , विषाणूजन्य आजारापासून पाल्याचा बाचाव करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत माता पालकांना अरुणा मठपती व श्री.युवराज जगताप सर यांनी मार्गदर्शन केले.इयत्ता ५वी शिष्यवृत्ती बाबत- श्री.श्रीकांत कुंभारे यांनी पालकांशी संवाद साधला.
सदर कार्यक्रमास श्री.युवराज जगताप सर, श्री.सुनील लंगोटे, श्री.श्रीकांत कुंभारे, श्रीम.संगीता काळे मॅडम,श्री.संतोष ठोंबरे सर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अरुणा मठपती मॅडम यांनी तर आभार श्री.कुंभारे सर यांनी मानले चहापानाने माता पालक मेळाव्याची सांगता करण्यात आली.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या