Recent in Technology

Advertisement

Breaking News

वरुड मोर्शी तालुक्याचा नळगंगा ते वैनगंगा नदिजोड प्रकल्पात समावेश करण्यात यावा-आमदार देवेंद्र भुयार यांची मागणी !

    * वरुड मोर्शी तालुक्यातील सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे साकडे !

    मोर्शी : वरुड मोशी तालुक्यामध्ये संत्रा हे मुख्य पिक असून विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील शेतकऱ्यांची आर्थीक घडी शेतीवर अवलंबून असल्यामुळे सद्यास्थितीत पाण्याची पातळी अतिशय खोल गेल्यामुळे मोर्शी वरुड तालुका अतिशोषीत असून विहीरी बोअर खोदण्यास बंदी आहे. वरुड तालुक्यामध्ये लघु प्रकल्प १५ असून ते पावसाच्या अनियमीततेमुळे कमी अधीक प्रमाणात भरतात त्यामुळे लाभ क्षेत्रातील भागाला पूर्ण लाभ मिळू शकत नाही. मोशी विधानसभा मतदार संघाती सिंचन प्रकल्पांची प्रलंबीत व अत्यंत आवश्यक असलेली विकास कामे पूर्ण करून वरुड मोर्शी तालुक्याचा नळगंगा ते वैनगंगा नदिजोड प्रकल्पात समावेश करण्यात यावा, मोर्शी वरुड तालुक्यातील सिंचनाच्या विकास कामांना मान्यता प्रदान करुन निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव अंतर्गत 292 अनये विरोधाकाचे मांडलेल्या प्रस्तावावर सभागृहात चर्चा केली.

    वरुड मोर्शी तालुक्याचा नळगंगा ते वैनगंगा नदिजोड प्रकल्पात समावेश करण्यात यावा. कन्हान ते वर्धा नदिजोड प्रकल्प राबवुन अतिशोषीत वरुड व मोशी तालुक्याचा समावेश करण्यास मंजुरी प्रदान करण्यात यावी. लखारा लघु सिंचन प्रकल्पास विशेष बाब म्हणुन प्रशासकीय मंजुरी प्रदान करुन निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. वरुड मोर्शी तालुक्यातील शेकदरी सिंचन प्रकल्प, त्रिवेणी सिंचन प्रकल्प, दाभेरी सिंचन प्रकल्पास बंदिस्त वितरण प्रणालीस (पि.डी.एन) मंजुरी प्रदान करण्यात यावी.

    अप्पर वर्धा सिंचन प्रकल्पाची सिंचन क्षमता वाढविणेसाठी पंढरी सिंचन प्रकल्प, नागठाणा सिंचन प्रकल्प, पाक सिंचन प्रकल्प, शेकदरी सिंचन प्रकल्प, त्रिवेणी सिंचन प्रकल्प, दाभी सिंचन प्रकल्प, बारुड सिंचन प्रकल्प, प्रकल्पाची पाणी साठवण क्षमतेचा परिसर वाढविणे. चिंचोली गवळी, आमपेंड येथे सिंचन प्रकल्पाचे बांधकाम करुन नविन सिंचन प्रकल्पाची निर्मीती करने यासह विविध विकासकांमना मान्यता प्रदान करुन निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.

    वरुड मोर्शी तालुक्याला अतिशोषीत अवस्थेतून पाण्याच्या दृष्टीने परीपूर्ण करण्याकरीता वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पातून पाणी पुरविण्यात यावे. वैनगंगा (गोसीखुर्द), नळगंगा (पूर्णा तापी), कन्हान वर्धा नदीजोड प्रकल्पामधे वरुड मोर्शी तालुक्यमधील सिंचनाच्या पाण्याचा अतिशोषीत प्रदेशाचा समावेश करुन शेती सिंचन पाण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी कन्हान - वर्धा नदी जोड प्रकल्प हा पर्यायही तपासून पाहण्यासाठी विनंती आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code