अमरावती : येथील कॅम्प परिसरातील जिल्हा उद्योग केंद्रा समोरील आनंद पॅलेस मध्ये सरकार करिअर अकॅडमी, नाशिक तर्फे स्पर्धा पूर्व परीक्षाचे प्रशिक्षण सुरु करण्यात आले असून सदर महत्वपूर्ण प्रशिक्षणाचा लाभ विध्यार्थी यांनी घ्यावा असे आवाहन प्रबोधिनीचे संचालक प्रा. रवींद्र सरकार यांनी केले आहे.
सरकार अकॅडमी ही राज्यातील सर्वात जास्त पीएसआय घडवीणारी एकमेव संस्था असून आजमितीस अकरा हजार विध्यार्थी शासनाच्या सेवेत रुजू झालेले आहेत.
सदर प्रबोधनी तर्फे एमपीएससी व यूपीएससीच्या विध्यार्थी यांना अद्यावत पद्धतीने छापील नोट्ससह संपूर्ण स्टडी मटेरियल उपलब्ध करण्यात येऊन कुशल व अनुभवी प्रा.सुधीर टोलमारे,व प्रा. दिपंकर गवई यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरणारे आहे. अकॅडमी मार्फत ऑडिओ, व्हिडीओ सुविधा उपलब्ध असून प्रा. सरकार हे प्रत्येक विध्यार्थी यांचेकडे व्यक्तिगत लक्ष देत असल्याची माहिती पिआरओ प्रभाकर वानखडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या