Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

जीवन

  चालून चालून थकून गेली वाट...
  पण अजून माझा सरला नाही थाट...
  माझ्या मनाला मीच समजावत असतो....
  नाहीतरी आपलंही आपण नसतो...
  कसेही करून मीच चांगला , हे सिद्ध करतो...
  कसेही करून माझेच भांडे भरून घेतो..
   कशाला ही मी आता चांगले समजत नाही...
   मला चांगले म्हणजे काय हेच समजत नाही...
   असाच जगण्याचा खेळ सुरू आहे....
   धावणे ,पळणे,थकने उठणे नित्य सुरू आहे...
   कसलाच भाव मनात,चेहऱ्यावर आता उमटत नाही....
   जगणे म्हणजे काय हेच आता समजत नाही...
   माणूस जगतो म्हणजे काय करतो हेच कळत नाही...
   माणूस माणूस आहे की एक साधा जीव हेच उमगत नाही..
   कसेही,,कधीही,,काहीही करून जगणे,,म्हणजेच जगणे होय का.?
   पोट भरण्यासाठी जगणे म्हणजे जगणे होय का....?
   -निलेश रामभाऊ मोरे
   मु.पोस्ट. मनभा
   तालुका कारंजा जिल्हा वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code