Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

बिचारे बोकड(काव्यमय गोष्ट)

    फिरताना जंगलात
    भूक लागली कोल्ह्यास
    एक हरीण मेलेले
    सुरू केले रे खाण्यास
    मांस खाल्ले पटापट
    बघा काय ते घडले
    दिन उन्हाचे कडक
    सुके नरडे पडले
    शोधू लागला विहीर
    जीव कासाविस झाला
    उडी मारली पाण्यात
    नाही विचारही केला
    होती तहान जेवढी
    पिला पाणी मग कोल्हा
    वाट दिसेना वरती
    खूप केला हल्ला गुल्ला
    वर दिसता बोकड
    लावी त्यास लाडीगोडी
    बुद्धी बोकडांची मंद
    त्याने ही मारली उडी
    बोले बोकडास कोल्हा
    भिंतीकडे पाठ कर
    तुला बाहेर काढण्या
    जातो मी प्रथम वर
    केली लबाडी कोल्हयाने
    गेला वरती चढून
    दिला बोकडास दगा
    गेला पाण्यात सोडून
    श्री.युवराज गोवर्धन जगताप
    काटेगाव ता : बार्शी
    जिल्हा: सोलापूर
    8275171227

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code